वेड लागलं मला वेड लागलं
येशूच्या प्रेमाचे वेड लागले – २
कोण्ही करणार नाही
कधी होणार नाही
अशी केलीस तू प्रीती – २
१ . केलीस तू आम्हावर प्रीती
देउनी क्रुसावरी
खाउनी फटके पाठीवरी
दिलीस मला – २
माझ्या श्वासात तू
माझ्या हृदयात तू
माझ्या जीवनात तू येशू – २
वेड लागलं …
२ . नाही कोण्ही या जगामध्ये
येशू तुझ्या सारखा
तुझ्यात मी आणि माझ्यात तू
राहू सदा सर्वदा – २
कोण्ही करणार नाही
कधी होणार नाही
अशी केलीस तू प्रीती – २
वेड लागलं …
नको दारूचं वेड देवा मला
नको सिगारेट चे वेड देवा मला
नको गुटक्याचे वेड देवा मला
नको पापाचे वेड देवा मला – २
लागूदे ख्रिस्ताचे वेड देवा मला
पवित्र आत्म्याचे वेड देवा मला
लागूदे वाचनाचे वेड देवा मला
लागूदे भक्तीचे वेड देवा मला – २
नाद नाही करायचा
माझ्या येशूच्या प्रेमाचा
Download aur apps
Stuti Geete
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.stutiGeete
Hindi Jesus Songs
https://play.google.com/store/apps/details?id=com.jangelapps.hindi_christian_songs
