पाहिला का प्रभू ख्रिस्त
खिळलेला खांबावरी
पाहिले का खिळे उरी
पदी दया पूर्ण करी
पाहिला का कंटकांचा
मुकुट रुतलेला शिरी
पाहिले का घळघळा
रक्त गळे भूमीवरी
पाहिले का कोण त्याची
क्षते खोल खोल करी
पाहिले कोण पापी
डाग देई दुखावरी
पाहिले का तारावया
कवणा तो दुःख वरी
पाहिले का कोणाकडे
प्रेमभरे पाही तरी
पाहिली का प्रीती अशी
जागी कधी स्वप्नी तरी
वाहिले का सर्व जिने
तुवा त्याच्या पदावरी