Harsh Mazhya Jivacha Mi Sangu Kuna हर्ष माझ्या जीवाचा मी सांगु कुनाBy barafsainath@gmail.com / April 28, 2026 हर्ष माझ्या जीवाचा मी सांगु कुना प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | धृ | | झाड उम्बराचे होते त्या वाटेवरी गर्दी पहनी चढतो त्या झाडावरी एक असता प्रभु तो दिसे लोचना प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | १ | | टक लावून बघतो प्रभु मजकडे बोले जकया उतर खाली तू ताकडे त्याला पाहताच स्वर्ग झाला ठेंगणा प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | २ | | खंत माझ्या जीवाची जाहली पुरी कृपा दृष्टी प्रभूची हो माझ्यावरी त्याच्या प्रेमाची आली मला कल्पना प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | ३ | | स्वागताची तयारी जहाली सुरु सांगा कैसी प्रभूची मी सेवा करू त्याच्या प्रेमाची आली मला कल्पना प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | ४ | |