Harsh Mazhya Jivacha Mi Sangu Kuna हर्ष माझ्या जीवाचा मी सांगु कुना

हर्ष माझ्या जीवाचा मी सांगु कुना

प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | धृ | |

 

झाड उम्बराचे होते त्या वाटेवरी

गर्दी पहनी चढतो त्या झाडावरी

एक असता प्रभु तो दिसे लोचना

प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | १ | |

 

टक लावून बघतो प्रभु मजकडे

बोले जकया उतर खाली तू ताकडे

त्याला पाहताच स्वर्ग झाला ठेंगणा

प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | २ | |

 

खंत माझ्या जीवाची जाहली पुरी

कृपा दृष्टी प्रभूची हो माझ्यावरी

त्याच्या प्रेमाची आली मला कल्पना

प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | ३ | |

 

स्वागताची तयारी जहाली सुरु

सांगा कैसी प्रभूची मी सेवा करू

त्याच्या प्रेमाची आली मला कल्पना

प्रभु आला घरी नाच माझ्या मना | | ४ | |

Scroll to Top